कार्यक्रमाबद्दल
३ डिसेंबर – जागतिक दिव्यांग दिन या निमित्ताने स्मित फाउंडेशन मधील २० ते २५ दिव्यांग मुलांनी, रिझन ट्रॅफिक फाउंडेशनच्या सहकार्याने सिंहगड रोडवरील भा. द. खेर (संतोष हॉल) चौकात सकाळी ११ ते १२ या वेळेत रस्ते सुरक्षा व वाहतूक नियमांचे प्रबोधन केले.
यावेळी मुलांनी वाहतूक नियमांचे फलक हातात घेऊन नागरिकांना वाहतूक नियम काटेकोरपणे पाळण्याचे आवाहन केले. त्यांच्या मनापासून केलेल्या या उपक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
या उपक्रमात रोटरी क्लब पुणे संस्कृती यांनीही सहभाग नोंदवला. तसेच सिंहगड पोलिस वाहतूक विभागाच्या अधिकाऱ्यांचेही मोलाचे सहकार्य लाभले, ज्यामुळे हा प्रबोधन उपक्रम अधिक प्रभावी ठरला.